धाराशिव येथिल नियोजीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी त्यांच्या पुतळ्याशेजारी रेल्वे आरक्षण कार्यालय येथिल जागेची पाहणी तुळजापूर तालुक्याचे आमदार श्री राणा जगजीतसिंह पाटिल यांनी केली आहे .
ही जागा हस्तांतरीत करण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत .
त्यामुळे आता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मोठी जागा मिळेल व एक भव्य असे मोठे स्मारक तयार करण्यात येईल .
धाराशिव शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आता जिथे आहे तीथे फार कमी जागा आहे . त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे .
लवकरच ही जागा हस्तांतरीत करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य असे मोठे स्मारक तयार करण्यात येईल असे आश्वासन आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिले आहे .
Discussion about this post