दुग्ध व्यवसाय हा भारतातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु, दुग्ध उत्पादकांना दर्जेदार पशुखाद्य आणि पूरक आहारांच्या उपलब्धतेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांमुळे पशुधनाचे आरोग्य आणि उत्पादकता यावर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होते.
अर्जुनवाड येथील लक्ष्मी व्हेट केअर या कंपनीची स्थापना याच समस्यांवर मात करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. दुग्ध उत्पादकांच्या समस्यांचे बारकाईने विश्लेषण करून, त्यांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन, कंपनीने दर्जेदार आणि किफायतशीर फीड सप्लीमेंट विकसित केली आहेत. शेतकऱ्यांना कमी दरात दर्जेदार गुणवत्तेची औषधे व फीड सप्लीमेंट उपलब्ध करून देण्याच्या कंपनीच्या या ध्येयामुळे लक्ष्मी व्हेट केअर ही केवळ एक कंपनी न राहता, शेतकऱ्यांच्या विकासाची एक प्रेरणादायी कहाणी बनली आहे.
*पुढील तीन वर्षांत कंपनीने केलेली प्रगती:*
गेली तीन वर्षे लक्ष्मी व्हेट केअरने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये आपले व्यापार जाळे विस्तारून देशभरातील शेतकऱ्यांचे विश्वास संपादन केले आहे. या कालावधीत कंपनीने ४० हून अधिक उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून दिली आहे. या उत्पादनांमध्ये कॅल्शियम चे विविध प्रकार, खनिज मिश्रणे, प्रिमिक्स व औषधे आणि इतर पूरक आहारांचा समावेश आहे.
*कॅल्सी प्रिमिक्स आणि कॅल्सी टॉपर डायमंड: शेतकऱ्यांची खात्री*
लक्ष्मी व्हेट केअरच्या कॅल्सी प्रिमिक्स या उत्पादनाने शेतकऱ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. कंपनी या उत्पादनाच्या १००% परिणामांची हमी देते. तसेच, कॅल्सी टॉपर डायमंड हे कॅल्शियम कॅन देखील उत्कृष्ट दर्जाचे असून, शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या आरोग्यासाठी ते वरदान ठरत आहे.
*शेतकरी कल्याणकारी योजना:*
लक्ष्मी व्हेट केअर ही केवळ उत्पादने विकणारी कंपनी नसून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. कंपनी विविध शेतकरी कल्याणकारी योजना राबवत असून, पशुसंवर्धन, विनामूल्य पशु आहार व्यवस्थापन मार्गदर्शन व गोटा व्यवस्थापन आणि प्रशिक्षण कार्यक्रम यांचे आयोजन करत आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाच्या आरोग्याची आणि व्यवस्थापनाची माहिती मिळते, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होते.
*भविष्यातील उद्दिष्टे:*
युवा साठी रोजगार निर्मिती त्यासोबत कंपनीचे उद्दिष्ट संपूर्ण देशात आपली उत्पादने पोहोचवून शेतकऱ्यांच्या विकासात हातभार लावण्याचे आहे. नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर भर देऊन, शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी सतत प्रयत्नशील आहे.
लक्ष्मी व्हेट केअर ही केवळ एक कंपनी नसून शेतकऱ्यांच्या प्रगतीची एक प्रेरणादायी कहाणी आहे.
[लक्ष्मी व्हेट केअरच्या अधिक माहितीसाठी व उत्पादनांच्या ऑर्डर साठी संपर्क साधा
8407916054 ]
*YOUTUBE CHANNEL*
https://youtube.com/@laxmivetcare3612?si=YJuOR1bLGNXZtaAF




Discussion about this post