मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : २६ ऑक्टोबर रोजी महाप्रसाद.
मानोरा ता प्र परमहंस झोलेनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त धामणी येथील लालमाती येथील संस्थानवर दिनांक १९ ऑक्टोंबर पासून पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे.
या निमित्त भागवत सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भानुदास पुसांडे महाराज हे भागवत वाचन करीत आहेत.दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजे पर्यंत भागवत कथा सुरू असून याचा लाभ भाविक घेत आहेत.त्याच प्रमाणे सकाळी काकड आरती,पारायण सायंकाळी हरिपाठ,भजन कीर्तन , प्रवचन आदी कार्यक्रम होत आहेत.
दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी दुपारी महाप्रसाद वाटप होणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन संस्थान चे वतीने ह भ प अण्णासाहेब पाटील यांनी केले आहे.
Discussion about this post