| माजी महापौर जयश्रीताई सुनील महाजन या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवणार असून पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज मातोश्रीवर जयश्रीताई महाजन यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांची पती तथा माझी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांनी त्यांच्या वतीने एबी फॉर्म स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या संदर्भात जयश्रीताई महाजन यांचे स्वीय सहाय्यक ललित धांडे यांना कॉल करून माहिती घेतली असता त्यांनी जयश्री ताईंना एबी फॉर्म मिळाल्याची माहिती दिली.
जळगाव महानगरपालिकेच्या माजी महापौर जयश्रीताई सुनील महाजन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी कधीपासूनच सुरू केली आहे. त्यांनी शहरात जनसंपर्क अभियान देखील राबवले आहे. मध्यंतरी जळगाव शहराची जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत संभ्रमाचे वातावरण होते.
यातच त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तुतारी हातात घेऊन लढणार याबाबतची चर्चा देखील सुरू होती. खरंतर महाविकास आघाडीमध्ये जळगाव शहराच्या जागेवरून मोठ्या प्रमाणात खेचताना देखील सुरू झाली होती. मात्र आज ही सर्व चित्र स्पष्ट झाले असून जयश्रीताई महाजन या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल चिन्हावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
FACEBOOK
ABOUT THE AUTHOR
EditorialDesk
RELATED POSTS
वाघनगरातील विवेकानंद शाळा व महाविद्यालयात ‘वाचनातून प्रेरणा’ यावर व्याख्यान
वाघनगरातील विवेकानंद शाळा व महाविद्यालयात ‘वाचनातून प्रेरणा’ यावर व्याख्यान
Discussion about this post