
या संदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका गावातल्या महिलेने मुक्ताईनगरात फिर्याद दिली आहे. यानुसार, एका पंधरा वर्षाच्या मुलाने त्या महिलेच्या सात वर्षे वयाच्या मुलीवर अत्याचार केला. त्याने चॉकलेटचे आमीष दाखवून तिला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडली. यानंतर मुलीने याबाबत पालकांना माहिती दिल्यानंतर याची माहिती त्यांना मिळाली.
दरम्यान, या संदर्भात पिडीतेच्या आईने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
Discussion about this post