
बाबूराव बोरोळे
जिल्हा प्रतिनिधी लातूर
डिगोळ.शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक मागील एक वर्षापासून कार्यरत असलेले शाळेतील सहशिक्षक शालीवाहान डोंगरे हे 31 सप्टेंबर 2024 रोजी बुधवारी प्रदिर्घ वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती सक्तार 25 सप्टेंबर रोजी शुक्रवारी शाळेत आयोजित करण्यात आला होता.
पहिल्यादा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी पत्नीकसह भर पेहराव आहेर करून भेटवस्तू देऊन सेवानिवृत्ती बद्दल सक्तार करून शाळेच्या वतिने निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम बिरादार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी अनिल पांगे.मुख्याद्यापक ईश्वर बिरादार.केंद्रप्रमुख डि.टी.बालुरे. तळेगाव दे चे. केंद्रप्रमु केंद्र प्रमुख बिग.एन.बिडवे. विरेंद्र उस्तुरगे केंद्रीय मुख्याध्यापक तळेगाव दे. जी.व्ही हंद्राळे चेअरमन शि.प.स.शि.अ. तुकाराम पाटील शिक्षण समिती अध्यक्ष.
सुनिल मुळे.चौथा स्तंभ ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबूराव बोरोळे.सरपंच सौ कविता दासरे.उपसरपंच बाबासाहेब पाटील. वैजनाथ बावगे माजी मुख्याध्यापक करखेली.शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष खदिर बागवान.भाऊसाहेब बिरादार.महेश पाटील.आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक ईश्वर बिरादार. डी.टी.बालुरे.गोविंद हंद्राळे.अनिता घोणे मॅडम.तुळशीदास बिरादार.तुकाराम पाटील. विवेक सुगावे.आदिनी मनोगत व्यक्त केले आहे.
यावेळी शाळेतील श्रीमती अनिता घोणे.एस.के.सुतार.श्रीमती.ए.एस.वकील.आर.एस.बिरादार.काळेबाग सर. डी.पी लोहार.श्रीमती.आर.जी.शिवपुजे.श्रीमती.एस.डी.जाधव.शालीवाहन डोंगरे .आदी शिक्षक उपस्थित होते.
टिप
मी ज्या ज्या शाळेत शिक्षक म्हणून गेलो त्या त्या ठिकाणी मी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य केले आहे व विद्यार्थ्यांना शिक्षण देवून घडविण्याचे कार्य केलं असून त्या त्या शाळेतील विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत हाच माझा गौरव आहे असे सेवा निवृत्त शिक्षक शालीवाहन डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले आहे.
शालीवाहन डोंगरे गुरुजी हे सेवानिवृत्त झाले असले तरीही या गावाची शाळा तुम्हाला उघडी आहे व या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक सामावून घेणारे आहेत. दोघांनाही दीर्घायुष्य लाभो त्यांचे पुढील आयुष्य सुखी समाधानी भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा बाबूराव बोरोळे यांनी लोकमतच्या वतिने आपल्या मनोगतातून व्यक्त केले .
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.के. सुतार यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक ईश्वर बिरादार यांनी केले.तर श्रीमती ए.एस. वकील यांनी मानले.
फोटो-डिगोळ ता. शिरूर अनंतपाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक शालीवाहन डोंगरे सेवानिवृत्त झाले त्यांचा शाळेच्या वतीने सहपत्नीक सत्कार करुन निरोप देण्यात आला.
Discussion about this post