
बाबूराव बोरोळे
जिल्हा प्रतिनिधी लातूर
देवणी तालुक्यातील वलांडी येथील पोद्दार इंग्लिश स्कूलच्या वतीने आज शुक्रवारी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते उदगीर निलंगा राज्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे वतीने विविध पथनाट्य सादर करण्यात आली.
यावेळी
संचालक अमित पोस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयाच्या वतीने इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची ही रॅली आयोजित करण्यात आली होती, या मतदार जनजागृती रॅलीमध्ये लोकशाही अधिकाधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या वतीने हातात मतदान करण्याचे घोषवाक्य फलक घेऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या जनजागृती रॅलीत विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत कुमार मल्लिकार्जुन हुडे, लक्ष्मीकांत पोस्ते यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
Discussion about this post