गेवराई प्रतिनिधि, दिलीप महानोर
सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रात होऊ घातलेली विधानसभा निवडणूक या वेळेसही ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाच्या विषयावर चुरशीची लढत होईल अशी शक्यता आहे कारण कारण अनेक दिग्गज नेते मंडळाची अपक्ष उमेदवार म्हणुन लढत या निवडणुकीत पहायला मिळत आहेत.
याच दिग्गजांच्या आणि प्रस्थापित राजकारण्यांना योग्य वेळी योग्य लढत देण्यासाठी धनगर समाजाचे व ओबीसी सेलचे नेते परमेश्र्वर महाराज वाघमोडे हे गेवराई विधानसभा मतदारसंघात बहुचर्चेत असलेले उमेदवार म्हणुन ओळखं आहे.त्यांना तालुक्यात मतदाराचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे.ते कीर्तनाच्या माध्यमातून तसेच रा स पा जिल्हाध्यक्ष पदावर काम करत असल्यामुळं जणसामन्यात त्यांचं नावं घराघरात पोहोचले आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होईल अशी शक्यता आहे.
Discussion about this post