रंगभूमीशी निगडित उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना संस्थांना दर वर्षी नाट्य परिषदेतर्फे गौरवण्यात येते. यंदाचे हे आठवे वर्ष असून शास्त्रीय गायक पंडित हृषीकेश बोडस आणि जेष्ठ साहित्यिक आणि कवी प्रा भीमराव धुळूबुळू यांच्यासह मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यमंदिरामध्ये या पुरस्कारांचे वितरण होईल पुरस्कार वितरणासाठी प्रसिद्ध नाटककार अतुल पेठे आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भोवाळकर उपस्थित राहणार आहेत. यंदाचा काकासाहेब खाडिलकर जीवनगौरव पुरस्कार पं हृषीकेश बोडस यांना तर आचार्य अत्रे प्रतिभारंग पुरस्कार प्रा भीमराव धुळूबुळू यांना देण्यात येईल. तर नाना तांडे नाट्यस्वर पुरस्कार विजयराव कुलकर्णी याना अरुण पाटील नाट्य तंत्र पुरस्कार प्रसाद गद्रे यांना दिलीप परदेशी नाट्यरंग पुरस्कार अरुण कापसे याना देण्यात येईल. श्रीनिवास शिंदगी बालरंगभूमी पुरस्कार मोहन दिंडे यांना तर विशेष सन्मान पुरस्काराने जयसिंगपूर येथील नाट्यशुभांगी संस्थेस गौरविण्यात येईल. डॉ मधू आपटे कलावंत पुरस्काराने किशोर चव्हाण आणि धनश्री गाडगीळ याना गौरविण्यात येईल. अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष आणि विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भास्कर ताम्हनकर यांनी दिली. ते म्हणाले कि कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता सुरु होईल खास श्रोत्यांसाठी कार्यक्रमाच्या आधी निवडक नाट्यगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहून पुरस्कार विजेत्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले कि या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी तज्ज्ञांच्या समितीचे गठन केले आहे त्यामध्ये मी स्वतः, अंजली भिडे, विशाल कुलकर्णी, प्रशांत गोखले प्रशांत जगताप, अपर्णा गोसावी, सचिन पारेख, श्रीनिवास जरंडीकर, मकरंद कुलकर्णी, रामचंद्र कोटणीस आणि कुलदीप देवकुळे आदी मान्यवर तज्ज्ञांचा समावेश आहे.
Discussion about this post