
राळेगांव तालुका प्रतिनिधी- अरविंद कोडापे
राळेगाव ७७ मतदारसंघ विधानसभा २०२४ च्या निवडणुकीकरीता महाविकास आघाडीतुन काँग्रेसचे प्रा.वसंत पुरके यांनी प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ, माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे माजी मंत्री,वर्षाताई निकम जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार),माजी मंत्री , सौ.संध्याताई बोबडे जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी,अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस ओबिसी विभाग, प्रविण देशमुख संचालक,कृ.उ.बा.स.मुबंई, विनोद काकडे तालुकाप्रमुख उबाठा, डॉ.रमेश महानुर व महाविकास आघाडीतील सर्व नेते, पदाधिकारी कार्यकर्ते
यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी प्रा.वसंत पुरके यांनी महायुतीत सरकारने, शेतकरी ,शेतमजुर, बेरोजगार,सर्वसामान्य नागरिक, महिला यांच्या विश्वासघात करुन महागाई , बेरोजगारी, महिला अत्याचार,जि.एस.टी, लावुन मोडले कंबरडे, त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांची जागा दाखविणार ,व आपले हक्काचे सरकार म्हणुन महाविकास आघाडीच्या सरकार बनविणार, मला माझे सर्व विधानसभा क्षेत्रातील माय, बाप भाऊ, बहीण, युवक, युवती मला ५० हजारांच्या लिडने निवडुन देईल असा मला विश्वास आहे..
माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे प्रा.वसंत पुरके यांनी जनतेला आश्वासित केले आहे..
Discussion about this post