
रिसोड तालुका प्रतिनिधी :-
स्वाभिमानी शेतकरी संघटना, वाशिम जिल्हा आणि रिसोड मालेगाव तालुका पदाधिकाऱ्यांनी आज माजी खासदार श्री अनंतराव देशमुख यांची रिसोड येथे भेट घेऊन निस्वार्थपणे पाठिंबा जाहीर केला. रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली..
Discussion about this post