

फुलंब्री 106 विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात स्विप कक्षाच्या वतीने अंजनडोह, नायगव्हाण, लामकाना या परिसरातील शेतमजुरांची भेट घेऊन विधानसभेच्या मतदानात जास्तीत जास्त मतदान करावे त्यासाठी जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी शेतीची कामे करण्यात गुंतलेल्या शेतमजुरांना श्रमदान जसे महत्त्वाचे आहे उपजीविकेसाठी तसेच मतदान सुद्धा लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यात आले.
मतदानाच्या बाबतीत आयोगाने केलेल्या विविध सुधारणा, अपंग व 85 वर्षांवरील वयोवृद्धांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा, मतदान केंद्रावरील पाळणाघर व सर्व सुविधा याबाबतीत सर्व कष्टकरी शेतमजुरांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी शेतमजुरांना मतदानाचे महत्त्व पटले व त्यांनी स्वयंस्फूर्तीने सांगितले की साहेब काम तर बारा महिने चालणार पण आम्ही मतदान नक्की करणार,सर्व कामे बाजूला ठेवून मतदानाला नक्की येऊ असे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी ब्रिजेश पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा कानगुले,स्वीप कक्ष प्रमुख क्रांती धसवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जगन ढोके ,देविदास तुपे,संतोष जाधव,काकासाहेब थोरात हे जनजागृतीचे काम करत आहेत.
Discussion about this post