



नायगाव तालुका प्रतिनिधी…
दिपक गजभारे घुंगराळेकर…
नायगाव शहरात महारॅली काढून शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार राजेश संभाजी पवार यांनी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी दाखल केली. यावेळी मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शहरातील डॉ.हेगडेवार चौक ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या महारॅलीमुळे हा रस्ता जाम झाला होता. पोलिसांनी मोठ्या कष्टाने वाहतूक सुरळीत केली.
यावेळी उमेदवार राजेश पवार यांनी आपल्या घनघनाती भाषणात मी जनतेचा आमदार आहे. जनतेने माझ्यावर प्रचंड प्रेम केले. त्यामुळे मी मागच्या वेळेस निवडून आलो. मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामाच्या बळावर मला जनता मागच्या पेक्षाही प्रचंड मतांनी निवडून देईल, यात कुठली शंका नाही, असे बोलून दाखवले. या सभेत अनेक मान्यवर मंडळींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुनमताई पवार यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीहरी देशमुख यांनी केले.
भाजपासह महायुतीतील मान्यवरांची उपस्थिती
आ.राजेश पवार यांची उमेदवारी दाखल करताना झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे, राजेश कुंटूकर, पुनमताई पवार, बापुराव गजभारे, प्रविण बियाणी यासह नांदेड जिल्ह्यातील भाजपाचे आणि महायुतीचे नेते मंडळी उपस्थित होते.
‘सर्वांगीण विकासासाठी निवडून देण्याचे आवाहन उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दीमुळे वाहतूकही झाली होती जाम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकास नामांकित दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत खा. अशोकराव चव्हाण यांनी देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात विकास आणि बदल घडवून आणला, तसाच बदल राजेश पवार यांनी आपल्या नायगाव मतदारसंघात विकासाची कामे करून बदल घडून आणल्याचे प्रतिपादन केले.
Discussion about this post