तालुका प्रतिनिधी समीर बल्की
चिमूर/भिसी :- कत्तलीसाठी नेणा-या जनावरांची अवैधरित्या शंकरपूर भिसी मार्गावर वाहतूक करीत असतांना दिनांक 2 नोव्हेंबर रोजी कालच्या मध्यराञी पोलिसांची धाड, अंधाराचा फायदा घेत चालक झाला फरार.
भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत शंकरपूर भिसी मार्गावर आज मध्यराञी एका बोलेरो पिकअपने कत्तलीसाठी नागपूरला नेणा-या जनावरांची वाहतूक होत असल्याची बातमी भिसी पोलीस स्टेशनला लागताच लगेच भिसीचे ठाणेदार चांदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघ,Hc1084 भोयर,चालक Pc मनोज यांनी अवैध्द वाहतूक करणारे बोलेरो पिकअप क्र.MH40BL3979 ला अडविली असता पोलिसांची गाडी पाहून चालकाने वेगाने शंकरपूरच्या दिशेने वाहन चालवून आंबोली गावाजवळ गाडी खाली उतरवून झुडूपातून पळून गेला.
पोलिसांनी पिकअपची पाहणी केली असता चार गोवंशीय जनावरेअत्यंत निर्दयपणे पायाला दोर बांधून कोंबलेल्या अवस्थेत दिसून आली.जनावरांची चोरी करून कत्तलीसाठी नेण्याचा चालकाचा डाव होता परंतू भिसी पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला.जनावरांची अंदाजे किंमत ४० हजार रूपये व पिकअपची किंमत ५ लाख असे ५लाख४०हजार रू.चा माल जप्त करून फरार आरोपी चालकाविरूद्ध भिसी पोलिस स्टेशनमध्ये अप क्र.२०३/२४ कलम २८१,३०३(२) भा.न्या.सं.सहकलम ५(e) ५(b) महाराष्ट्र पशूसंवर्धन अधिनियम सहकलम ११(१)(ड)११(१(फ)प्राण्यां.छ.प्रतिबंधकअधिनियम सहकलम ८३/१७७ महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिसी पौलीस करीत आहेत.
Discussion about this post