प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब..
रविवार दिनांक १६ मार्च रोजी सकाळी ११ :०० वाजता काँग्रेस भवन रत्नागिरी..
रत्नागिरी (प्रतिनिधी असलम शेख रत्नागिरी) :
येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी स्वतः चर्चा करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष व निष्ठावंत कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष बळकटीकरणाकरिता मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी काँग्रेस भवन येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा व पक्षाच्या स्थितीचा स्वतः निरीक्षण करून प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लावणार आहेत.
जिल्ह्याचा अध्यक्ष कोण होणार हे अद्याप निर्णय झाला नसल्याने कोणत्याही बातम्यांना अफवांना बळी न पडता जिल्ह्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी १६ मार्च रोजी उपस्थित राहून पक्षाबाबत व पक्षाच्या भविष्यातील वाटचालीच्या नियोजनाबाबत आपल्या भूमिके बाबत प्रदेशाध्यक्षांना अवगत करावे.
रत्नागिरी जिल्हातील काँग्रेसचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी त्याचबरोबर महिला काँग्रेस, सेवा दल, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, इंटक, अल्पसंख्यांक विभाग, अनुसूचित जाती जमाती विभाग, ओबीसी सेल व इतर सर्व विभाग व सेलचे पदाधिकारी सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
मनेष राऊत,
सचिव..
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व प्रभारी रत्नागिरी जिल्हा…
Discussion about this post