प्रतिनिधी : तात्यासाहेब शिरगावे.
जयसिंगपूर :
श्रीवर्धन पाटील फाउंडेशन, दानोळी संचलित एस. पी. विद्यानिकेतन, जैनापूर या शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. स्वाती राहुल भापकर, कार्याध्यक्ष, शिवसेना महिला आघाडी शिरोळ तालुका होत्या. तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ. मानसी अतुल कोळी. तसेच मा. सौ. चैताली पाटील, मा. सौ. शरावती कदम, मा. सौ. सायली लंगरे – पाटील आणि मातोश्री मा. सौ. शांताबाई पाटील या सर्व रणारागिनिंच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचे सुरुवात झाले.
या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित सर्व माता पालकांचे विविध मनोरंजनात्मक खेळ व गुणवत्ता चाचणी घेण्यात आली. विजेत्या पालकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उत्कृष्ठ उपक्रम केलेल्या माता पालक सौ. अंकिता पाटील यांचा सत्कार मा. सौ. मानसी कोळी यांनी केला. यावेळी इ. 3 री च्या विद्यार्थिनींनी करावके हे प्रसिद्ध गाणे गायिले. त्याचबरोबर अबॅकस मधील विद्यार्थीने गणिती क्रिया करून दाखविले व स्पष्टीकरण दिले.
प्रमुख पाहुण्यानी आपल्या मनोगतातून आरोग्य, सबलीकरण तसेच आहार व स्वतःसाठी वेळ द्या आणि आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे, असे सांगितले.
यानंतर इ. 4थी ते इ.9वी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी लाठी – काठी चे कसरतीचे खेळ प्रदर्शन केले. यासाठी शाळेतील शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले आहे.
या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक चेअरमन मा. डॉ. श्री. आण्णासाहेब पाटील (पोलीस), व्हा. चेअरमन मा. श्री. नागेश कदम, शाळेचे मुख्याध्यापक तसेच संस्थेचे सचिव मा. श्री. विद्यासागर पाटील सर तसेच माता व पिता पालक, विद्यार्थी – विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post