
हवेली, वार्ताहर. अनिल वाव्हळ -९९७५३८१३१० .२१३ हडपसर विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे निवडणूक दैनंदिन खर्च लेख्यांची तपासणी खालील दिनांकाप्रमाणे करण्यात येणार आहे. ही तपासणी हडपसर विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक खर्च पर्यवेक्षक श्री. उमेश कुमार (IRS) यांचे समक्ष केली जाणार आहे.
सदरची तपासणी तीन टप्प्यात होणार असून, उमेदवारांच्या निवडणूक दैनंदिन खर्च लेख्यांची पहिली तपासणी दि.०९ नोव्हेंबर २०२४ रोजी, दुसरी तपासणी दि. १३ नोव्हेंबर रोजी व तिसरी तपासणी दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता, २१३ हडपसर विधानसभा मतदार संघाचे कार्यालय – विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह, हडपसर येथे होईल, अशी माहिती मा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, हडपसर विधानसभा मतदार संघ, पुणे यांनी दिली आहे..
Discussion about this post