
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे..
मानोरा : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा मानोरा- मालेगाव, नटश्री बहुउद्देशीय संस्था मानोरा आणि स्त्रीशक्ती बहुउद्देशीय संस्था मानोरा यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी हनुमान मंदिर सभागृह जुने शहर मानोरा येथे जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाखेचे ज्येष्ठ सभासद जगदीश जोशी होते.तानाजी तायडे,राजेंद्र सिंह राजपूत ,यशवंत पद्मगिरवार, माणिक डेरे,राज कोरले,राधा सावरकर, रवी भोंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी प्रथम नटराज पूजन,स्तवन करून नांदी म्हटली.वर्षभरात दिवंगत कलावंत आणि शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रसंगी राजेंद्रसिंह राजपूत,माणिक डेरे,जगदीश जोशी आदींनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक शाखेचे प्रमुख कार्यवाह यशवंत पद्मगिरवार यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात जागतिक रंगभूमी दिना विषयी माहिती दिली.
संचलन आनंद खुळे यांनी केले.किरण पद्मगिरवार यांनी आभार मानले.
या वेळी काही ज्येष्ठ कलावंत यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.वृध्द कलावंत यांचा सत्कार करण्यात आला. काही कलावंतांनी आपली कला सादर केली.
या वेळी शाखेचे उपाध्यक्ष योगेश देशमुख,सदस्य पंडित राठोड,नारायण इंगोले,दिवाकर पद्मगिरवार,शामराव राऊत,दयाराम जांभरूनकर ,गोविंदराव काजळे,दीपक भगत,अरुण पिंपळकर,गौरी पद्मगिरवार, मिलिंद मनवर,राज कोरले, धनश्री खरगडे,श्वेता खरगडे,चिन्मय पद्मगिरवार आदी उपस्थित होते..
Discussion about this post