

मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे..
मानोरा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या म्हसणी येथे मानोरा पोलिसांनी दिनांक ६ नोव्हेंबर रोजी दोन ठिकाण गावठी दारू भट्टी वर छापा टाकला.त्यात २ लाखाचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
पोलीस सूत्रा कडून प्राप्त माहिती वरून सविस्तर असे की, म्हसनी येथे गावठी दारू भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली असता आरोपी अनिल किसनराव सोहळकर, ललिता अजय मात्रे आणि भीमराव टिके यांचे कडे छापा टाकला असता गावठी दारू, सडवा मोहा माच ,इतर साहित्य असा एकूण १ लाख ९९ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
फिर्यादी जमादार मदन पुणेवार, सुभाष महाजन यांचे तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी अनिल किसनराव सोहळकर, ललीता अजय मात्रे, भिमराव महादेव टिके यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम चे कलम ६५ (इ)(फ) अनव्ये कार्यवाही करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप अल्लापुरकर, सफौ सुभाष महाजन, सफौ रविन्द्र राजगुरे,मदन पुणेवार, मनिष अगलदरे, पोशी शंकर राख, योगेश मनवर, विजय राठोड, करण राठोड आदींनी केली..
Discussion about this post