
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनसुराज्य शक्ती व महायुतीचे उमेदवार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू) यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.तसेच ‘नारळाची बाग’ ही त्यांची निशाणी लक्षात ठेवून त्यांना विजयी करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केले…
जनसुराज्य शक्ती पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्ता असलेल्या दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू) यांना हातकणंगले विधानसभा निवडणुकीसाठी उभे केले असून आगामी २३ नोव्हेंबर रोजी इथे त्यांच्याच विजयाचा भंडारा उधळला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी व्यक्त केला…
तसेच प्रचाराचा नारळ फोडून सभेला सुरुवात केली असून विजयाचा नारळ फोडण्यासाठी ‘नारळाची बाग’ हे चिन्ह दाबून दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू) यांना विजयी करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे केले. यावेळी महायुतीतील सर्व घटकपक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते
सागर पाटील हातकणंगले तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा..
Discussion about this post