
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पलूस तालुक्यातील सावंतपुर येथील काँग्रेस पक्षातील श्री. ऋषिकेश जावीर, सौरभ सूळे, सत्यजित जाधव, विकास यादव, अंकुर सुतार, दिनेश हलसकर, अभिजीत जाधव, अभिषेक जाधव, सागर जाधव, गणेश सावंत यांनी व सोबत अनेक कार्यकर्त्यांनी तसेच कडेगाव तालुक्यातील रायगांव येथील श्री. भालचंद्र शंकर घाडगे यांनी २८५ पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री. संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
या वेळी पलूस तालुक्यातील सावंतपुर तसेच रायगांव गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.
Discussion about this post