





गाव – नंदेश्वर, ता. मंगळवेढा, जि.सोलापूर येथील मा.श्री. दत्ता करे साहेब यांची जीवनगाथा ही अत्यंत प्रेरणादायी आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून त्यांनी आपले यशस्वी जीवन घडवले. लहानपणी घरची अत्यंत गरीब परिस्थिती होती. वडील दारूच्या आहारी गेलेले, आणि सर्व घराची जबाबदारी आईवर होती. त्यांना शालेय शिक्षण व्यवस्थित घेता आले नाही, कारण त्यांचे आई-वडील कायम एका गावाहून दुसऱ्या गावात स्थलांतर करत होते.
या संघर्षातून त्यांनी जीवनाला आकार देण्याचे ठरवले. प्रारंभी ते शेतात काम करत असत आणि महिन्याला ३५ रुपये मिळवत होते. मात्र, त्यांच्यातील जिद्द आणि मेहनत त्यांना पुण्यापर्यंत घेऊन आली. पुण्यातील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेत काम करताना प्रारंभी त्यांना पगार मिळाला नाही, पण त्यांनी कष्ट करणे सुरू ठेवले. नंतर तीन हजार पगार मिळू लागला, आणि पहिला पगार त्यांनी आपल्या आईला दिला.
कामाच्या अनुभवातून त्यांनी आपल्या आयुष्यात प्रगती केली. काही अडचणींमुळे त्यांनी शिक्षण संस्था सोडली, परंतु पुन्हा वॉचमन म्हणून काम सुरू केले. या काळात त्यांना एका मुलीवर प्रेम झाले आणि विरोध असूनही त्यांनी लग्न केले. यानंतर त्यांनी मेस चालवली, पण नंतर हाउसकीपिंगचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला त्यांनी छोटे काम घेतले, परंतु मेहनतीने आणि जिद्दीने त्यांनी 1.MDK Green World Pvt. Ltd
2.JK.RELIABLE BUSINESS GROUP नावाची हाउसकीपिंग सर्व्हिस कंपनी स्थापन केली. आज त्यांची कंपनी पुण्यात मोठ्या प्रमाणावर काम करते, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली २०० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.
संपूर्ण प्रवासात दत्ता करे साहेबांनी कधी हार मानली नाही. आज ते स्वतःच्या घरात राहतात, त्यांच्या मालकीच्या गाड्या आहेत, शेती आहे, तरीही साधेपणाने ते टूव्हीलरवर फिरतात. त्यांचा संघर्ष आणि यशाची कथा ही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
(पुणे शहर प्रतिनिधी- राम सुरवसे)
मो. 9518551565)..
Discussion about this post