भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
१६१, चारकोप विधानसभा मधील भाजपाचे कार्यसम्राट आमदार योगेश सागर यांना प्रचार फेरी दरम्यान वाढती लोकप्रियता मिळत असल्याचे पाहून विरोधकांना धडकी भरली.कांदिवली चारकोप चौथ्या वेळी विधानसभा निवडणूक लढवित असलेल्या भाजप योगेश सागर यांनी या विभागात पाणी,रस्ते, लाईट, शौचालय,दवाखाने,खेळाची मैदाने, नवीन शाळा,कालेज, महिलांना शिलाई मशीनचे , मेंदी क्लास, ब्युटी पार्लर ट्रेनिंग, श्रवण यंत्र,मुला मुलींना महागाडे शाळा कॉलेज प्रवेश देणे,गरिब मुला मुलींना उच्च शिक्षण देणे,विज दर वाढीच्या विरोधात मोर्चा काढणे,गरिब मुलीचे सामुहिक विवाहाचे आयोजन,
संसार उपयोगी वस्तू देणे, आरोग्य शिबीर, रक्त दान शिबीर, दिवाळी पहाट गाणी कार्यक्रम चे आयोजन,गरिब,मुला मुलींना शिक्षणासाठी संगणक मुफ्त देणे, रुग्णांना लहान मोठ्या शस्त्रक्रिया साठी आर्थिक मदत करणे, विभागातील झोपडपट्टी एस,आर, योजनेत रहिवासीच्या बाजूने उभे राहणे, विकासकाकडून इमारत चांगल्या सुस्थितीत तयार करून घेणै,रुम च्या चावी वाटप करणे,पोयसर नदीतील पाण्यातील गाळ काढणे, वगैरे वगैरे प्रकारची कामे कार्यसम्राट आमदार योगेश सागर यांनी करून चारकोप कांदिवली विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे
.प्रचार फेरी दरम्यान ठिक ठिकाणी महिला व पुरुष गर्दी करीत होते.योगेश सागर यांना फुलांचा हार घालून शुभेच्छा देत होते.तर महिला पंचारती ने ओवाळताना दिसत होत्या.” जय जय जय शिवाजी जय जय जय भवानी” योगेश सागर आगे बढो,हम तुमारे साथ है’ ” भारतीय जनता पक्षाचा विजय असो” अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.योगेश सागर घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेत होते, समस्या जाणून घेत होते.येत्या २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५वाजेपर्यत मतदान करण्यासाठी जाऊन कमळ या निशाणी वर मोहर लाऊन जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करा ” असे योगेश सागर मतदारांना आवाहन करीत होते.
Discussion about this post