प्रतिनिधी: दशरथ दळवी
सफाळे : 15 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सफाळे नारोडा, येथे धरती आबा बिरसा मुंडा यांची 149 वी जयंती पार पडली. यावेळी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, आदिवासी रत्न काका धोदडे, सफाळे येथील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक नारायण झिपर सांबरे, स्वातंत्र्य सैनिक खूण्या शिनवार डुकले, यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुधाकर भोईर यांनी तर प्रमुख पाहूणे म्हणून सुरेश भोईर, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पुढच्या वर्षी याच ठिकाणी 8 नोव्हेंबर रोजी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती साजरी करू असे सुरेश भोईर यांनी सांगितले. पंचायत समिती सदस्य रुपेश धांगडा, मनोज चिपाट, सुरेश भोईर, नितीन बोंबाडे यांनी बिरसा मुंडा यांचा जीवनपट उलगडला. यावेळी प्रमोद सांबरे, संतोष बोंबाडी ,कल्पक मानकर, विश्वनाथ मालकरी, रवी मंडळ, नथू पिलेना, विनोद सुतार, जगन मेढा, कल्पक मानकर, तुलसी बोंबाडी, शुभांगी पिलेना, गणेश पिलेना, सुनील घोष, किशोर मेढा, अरुण खैराडी, बबन धांगडा, प्रेमा कोम, रमेश हाडळ, सुनील कोम, किशोर, कैलास मानकर, यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन नितीन बोंबाडे यांनी केले तर आभार पंचायत समिती सदस्य रुपेश धांगडा सर यांनी मानले
Discussion about this post