सणानिमित्त नववधूचे माहेरी आगमन..
प्रतिनिधी /वाल्मीक सूर्यवंशी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ व परिसरात श्रावण महिन्यात येणारा नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यास अन्याय साधारण महत्त्व असून हिंदू धर्मातील एका दंत कथेनुसार समुद्रमंथनानंतर जखमी झालेला कालिया साप हा समुद्रात बुडत असताना श्रीकृष्णाने पाहिले त्यास समुद्रात बुडू न देता बाहेर काढून त्याची विधिवत पूजा ज्या दिवशी केली तो दिवस श्रावण महिन्यात येत असून,
त्या दिवसापासून नागपंचमी हा सण साजरा करण्यात येत असल्याचे पहावयास मिळते. श्रीकृष्णाने कालिया सापाची प्राण वाचहून त्या दिवशी विधिवत पूजा केली त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी नागपंचमी हा सण साजरा करत असल्याचे आपणास पाहावयास मिळत असून महिन्यामध्ये श्रावण शु.५. दि.९ ऑगस्ट रोजी नागपंचमी सन साजरा करण्यात आला.
या दिवशी हिंदू धर्मातील माता भगिनी नागदेवतेची विधीवत पूजाअर्चा करून आपल्या मनातील मनोकामना नागदेवते पुढे व्यक्त करत असून समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. या दिवशी नागदेवतेचा दुग्ध अभिषेक करण्यात येऊन नैवेद्यही दाखवण्यात येत असतो. लग्नसराई मध्ये ज्या नवविवाहित मुलींचे लग्न झालेले असतात त्या नवविवाहित वधू नागपंचमी सणानिमित्त आपल्या माहेरी येऊन नागदेवतेची ही विधीवत पूजा करण्याची परंपरा आज ही पहावयास मिळते.
चौकात :- श्रावण महिन्यात येणारा नागपंचमी हा सण महिलांसाठी आनंदाचा असून या दिवशी आम्हाला नागदेवतेची पूजा करण्याचे भाग्य लाभलेले आहे. या दिवशी आम्ही विधीवत मनोभावे नागदेवतेची पूजा अर्चा करून आशीर्वाद घेतो. रेणुका संजीव कांबळे.
चौकट :- आम्ही लहानपणी आमची आई नागपंचमी दिवशी विधिवत नागदेवतेची पूजा दरवर्षी करत असल्याचे पाहून आम्ही पण लग्नानंतर माहेरी येऊन नागदेवतेची पूजा करत नागपंचमी सण आनंदाने साजरा करतो. पल्लवी नागनाथ सुरवसे.
चौकट :- समुद्रमंथनानंतर जखमी झालेला कालिया साप समुद्रात बुडत होता त्यास श्रीकृष्णाने बाहेर काढून त्याची विधिवत पूजा केली त्या दिवसापासून नागपंचमी हा सण हिंदू धर्मात साजरा केला जातो.
पुरोहित पुरुषोत्तम जोशी तळेगाव.
Discussion about this post