अक्षय ठोंबरे (वैजापूर तालुका प्रतिनिधी)
वैजापूर- गंगापूर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार बोरनारे रमेश (सर) नानासाहेब.यांनी दिनेश परदेशी यांचा पराभव केला.दिनेश परदेशी यांना ९१३७७मत पडले तर रमेश बोरनारे यांना १३२८३२मत पडले.रमेश बोरनारे यांना ४१४५५ मतांनी विजय मिळवला.रमेश बोरनारे हे पहिल्या पासून आघाडीवर होतं
विजयाच्या महत्त्वाचे क्षण
रमेश बोरनारे यांच्या विजयामुळे, महायुतीचे सरकार परत एकदा स्थापन होणार याची खात्री मिळाली आहे. या विजयाने वैजापूर-गंगापूर मतदार संघात आनंदाची लाट निर्माण केली आहे. विजयाच्या क्षणी रमेश बोरनारे यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. त्यांच्या या यशाने स्थानिक जनतेमध्ये एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे
Discussion about this post