विहिरगांव प्रतिनिधी- रजत चांदेकर
राळेगांव तालुक्यातील विहिरगांव येथे दि.23 नोव्हेंबर रोजी आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना द्वारे आयोजित 114 शहिद गोवारी श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 23 नोव्हेंबर 1994 ला नागपूर मध्ये टी पॉईंटवर झालेल्या चेंगराचेंगरीत 114 गोवारी बांधव शहिद झाले होते. त्या दुर्दैवी घटनेला 30 वर्ष पूर्ण झाले या निमित्त विहिरगांव येथील गोवारी शहिद स्मारक परिसरात श्रध्दांजली घेण्यात आली. फुलांनी सजविलेल्या शहिद गोवारी स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आदिवासी गोवारी बांधव व ग्रामस्थ आले होते.
यावेळी उपसरपंच कपिल वगारहांडे,प्रमोद नेहारे,निलेश राऊत, विठ्ठल चामलाटे,हिम्मत कुळसंगे,अरविंद कोडापे,नितीन वगारहांडे,निलेश चचाणे,अतुल येडकाडे,अमित राऊत आदि उपस्थित होते.
Discussion about this post