भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
धनगर समाजाचे सहा उमेदवार विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारीवर विजयी झाल्याने समाज प्रगल्भते कडे जात असल्याचे निदर्शनास येत आहे.दोन अडिच कोटी संख्या असलेला धनगर समाज शेळ्या मेंढ्या मागे रानोमाळ विखुरलेल्या अवस्थेत भटकंती करीत होता, शिक्षणापासून वंचित, सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक,व इतर क्षेत्रापासून अलिप्त होता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षण दिलेले असताना राज्य कर्त्याच्या ना कर्तेपणा मुळे याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.पण काळ जसजसा बदलत होता तसतसा धनगर समाज शिक्षणाने जागृत झाला,व आपल्या वर झालेल्या अन्यायाने अस्वस्थ झाला, त्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली, यातून समाजात अनेक संघटना, संस्था निर्माण झाल्या.
त्यातूनच सकल धनगर समाज संघटना ही धनगर समाजातील सुशिक्षित बांधवाची संघटना निर्माण झाली,या संघटनेने धनगर समाजाला जनजागृती करुन जागृत केले,याचाच एक भाग म्हणून राजकीय नेतृत्व निर्माण करण्यासाठी ठराव पारित करून समाजाला राजकीय नेतृत्व निर्माण करण्यासाठी पाठिंबा द्यावा,व धनगर समाजाचे उमेदवार निवडून आणावे, नुकतीच विधानसभा निवडणुक पार पडली, यामध्ये धनगर समाजाचे सहा उमेदवार निवडून आले, त्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा.हे धनगर समाज बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.सहा उमेदवार निवडून आले ते पुढील प्रमाणे १ गोपीचंद पडळकर..जत.२.बाबासाहेब देशमुख.. सांगोला ३.. दत्तात्रय भरणे मामा.. इंदापूर ४.. नारायण आबा पाटील.करमाळा ५.. उत्तमराव जानकर.. माळशिरस ६ सचिन कांबळे.. फलटण.
कर्जत जामखेड मधून राम शिंदे यांचा निसटता पराभव झाला.
Discussion about this post