वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे.
वैजापूर येथे बोगस खताची विक्री जोरात सुरू असताना याची कोणालाही कल्पना नाही असे असून वैजापूर येथील “महादेव ऍग्रो सर्विसेस”कृषी सेवा केंद्रावर कृषी अधिकाऱ्यांनी टाकले धाड! वैजापूर येथील पारोळा गावामध्ये महादेव अग्रो सर्विसेस कृषी सेवा केंद्र आहे. तेथे बनावट खते असल्याची तक्रार कृषी विभागाकडे गेली त्यानुसार त्यांनी पारोळा येथे महादेव ऍग्रो सर्विसेस कृषी सेवा केंद्रावर छापा टाकल्यामुळे तेथे बोगस खते आढळली. महादेव ऍग्रो सर्विसेस कृषी सेवा केंद्राचे मालक (आकाश सोमनाथ जगताप. रा. पाराळा) याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात खत निरीक्षक तथा पंचायत समिती चे कृषी अधिकारी जगदीप ज्ञानबा वाघमारे यांनी शिऊर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पाराळा येथील एका शेतकऱ्याने कृषी विभागाकडे तक्रार केली होती की पारोळा येथे महादेव अग्रो सर्विसेस कृषी सेवा केंद्र बोगस खताची विक्री सुरू आहे. त्यानुसार खत कंपन्याच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन खत निरीक्षक वाघमारे यांनी महादेव ऍग्रो कृषी केंद्र वरती छापा मारला. आकाश सोमनाथ जगताप यांनी बनावट खाते गोडाऊन मध्ये ठेवली होती. गोडाऊन मध्ये वेगवेगळ्या खतांच्या कंपन्याचा (५५ गोण्या किंमत ९१ हजार८९० रुपये) जप्त केला.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगळे करीत आहे
Discussion about this post