हवेली तालुका प्रतिनिधी – अनिल वाव्हळ
सामान्य कुटुंबात जन्मलेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काम केले. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते भारताचे उपपंतप्रधान अशी त्यांनी यशस्वी घौडदौड केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कृषी,कला,क्रीडा,साहित्य,औद्योगीक,
समाजकारण अशा विविध क्षेत्रात काम करून महाराष्ट्राची सर्वागीण प्रगती केली. यशवंतराव चव्हाण हे खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत असे प्रतिपादन साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वप्रथम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानिमित्ताने प्रसाद मोराळे,श्रेयश जाधव,सोहम दुबळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.विद्यालयातील शिक्षिका रेश्मा बोडके यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या कार्य कर्तृत्वाची माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,माधुरी राऊत, सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमल मोरमारे यांनी केले. आभार वैशाली देवमाने यांनी मानले. तर सूत्रसंचालन गणेश निचळे यांनी केले.


Discussion about this post