सहाही मतदारसंघांत भाजपचे वर्चस्व
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात मतांचे दान टाकले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अमर काळे यांना निवडून दिले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याच मतदारांनी भाजपच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले आहे. विशेष म्हणजे, वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या जिल्ह्यातील चार मतदारसं- घांसह अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत भाजपचेच उमेश ऊर्फ चंदू यावलकर तर धामणगावमध्ये प्रताप अडसड विजयी झाले आहे. अवघ्या सहा महिन्यांत बाजी पलटली आहे.
वर्धा : विधानसभा निवडणुकीत भाजपने शतप्रतिशत यश प्राप्त केल्याने विधानसभेत प्रथमच जिल्ह्यातून काँग्रेसचा आमदार नसणार आहे. चारही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने विधानसभेत गांधी जिल्हा काँग्रेसमुक्त झाला आहे. गांधी जिल्ह्यातून आतापर्यंतच्या इतिहासात विधानसभेत प्रथमच काँग्रेस किंवा इतर दुसऱ्या पक्षाचा उमेदवार नसेल.
वर्धा, आर्वी, देवळी आणि हिंगणघाट, अशा चारही मतदारसंघांत कमळ फुलले आहे. तीन ठिकाणी सुरुवातीपासून भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली होती. केवळ वर्धा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आघाडीवर होते. मात्र, जवळपास तेराव्या फेरीनंतर वर्धेतही भाजपने मुसंडी मारली. अखेर चारही मतदारसंघांत भाजप उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आता ‘गांधी जिल्हा’ म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यातून विधानसभेत काँग्रेस हद्दपार झाली आहे. गांधी जिल्हा प्रथमच
विधानसभेत ‘काँग्रेस’ मुक्त झाला आहे. वर्धा मतदारसंघातून डॉ. पंकज भोयर, आर्वीतून सुमित वानखेडे, देवळीतून राजेश बकाने आणि
सहाही मतदारसंघांत भाजपचे वर्चस्व
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात मतांचे दान टाकले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अमर काळे यांना निवडून दिले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याच मतदारांनी भाजपच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले आहे. विशेष म्हणजे, वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या जिल्ह्यातील चार मतदारसं- घांसह अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत भाजपचेच उमेश ऊर्फ चंदू यावलकर तर धामणगावमध्ये प्रताप अडसड विजयी झाले आहे. अवघ्या सहा महिन्यांत बाजी पलटली आहे.
हॅट ट्रिक तर साधली, मंत्रिपद मिळणार का?
वर्धेतून डॉ. पंकज भोयर, तर
हिंगणघाटमधून समीर कुणावार यांना भाजपने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. डॉ. भोयर आणि कुणावार यांनी विजय प्राप्त करून हॅट् ट्रिक साधली आहे. भाजपने आर्वीतून सुमित वानखेडे आणि देवळीतून राजेश बकाने यांना उमेदवारी दिली होती. या दोघांनी विजय मिळवून प्रथमच विधानसभेत प्रवेश मिळविला आहे. आता राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. त्यात जिल्ह्याला मंत्रिपदाची लॉटरी लागणार का, असा प्रश्न आहे. किमान एखादे संवैधानिक पद तरी मिळेल का, असा प्रश्न आहे.
हिंगणघाटमधून समीर कुणावार विजयी झाले. चारही जागांवर भाजपने विजयश्री प्राप्त केली.
वर्धा येथे काँग्रेसचे शेखर शेंडे, देवळीत काँग्रेसचेच विद्यमान आमदार रणजित कांबळे, आर्वीत खासदार अमर काळे यांच्या धर्मपत्नी आणि राष्ट्रवादी
‘नोटा’ला मते जादा, सर्व फॅक्टर निष्प्रभ
कोणत्याही निवडणुकीत मुख्य पक्षांशिवाय इतर पक्ष, आघाड्या, अपक्ष प्रभावी ठरतात, असे आतापर्यंतच्या निवडणुकीतून दिसून आले होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीत बसपा, वंचित, गोंगपा, रिपाइं आदींसह अपक्षही निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, रिंगणातील काही उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला जादा मते मिळाली. आर्वीत १८ पैकी ११, देवळीत १४ पैकी सात, हिंगणघाटमध्ये १२ पैकी सात, तर वर्धा मतदारसंघात १६ पैकी तब्बल ११ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली आहेत.
शरद पवार गटाच्या उमेदवार मयुरा काळे तर हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश पदाधिकारी अतुल वांदिले यांना पराभवाचा झटका बसला. एक प्रकारे महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सुपडासाफ झाला आहे.
Discussion about this post