वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे.
वैजापूर तालुक्यातील गोळवाडी शाळेचा प्रकार, गोळवाडी गावामध्ये जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शाळा एकाच ठिकाणी आहे व त्यांना जाण्यासाठी एकच दरवाजा आहे. परंतु अंगणवाडी शिक्षिका व मुले शाळेच्या गेटपासी अर्धा ते पाऊण तास त्यांना गेट उघडण्याची वाट बघावी लागते.
कारण की अंगणवाडी शिक्षिका वाकचौरे मॅडम यांनी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकांना (डिके मॅडम) यांना एक महिन्यापासून गेट ची चावी मागितली होती. परंतु डिके मॅडम ने अंगणवाडी शिक्षिका यांच्याकडे चावी न दिल्याने अंगणवाडी शिक्षिका व मुलांना तासंतास गेटच्या बाहेरच थांबवावे लागते. वारंवार त्यांनी शालेय अध्यक्ष सुनील पगार यांनाही सांगितले होते परंतु तेही म्हटले की चावी मुख्याध्यापिका शशिकला डिके (पगार) यांच्याकडे आहे. अंगणवाडी सकाळी ८:३० सुरू होते व जिल्हा परिषद शाळा ९:३० सुरू होते त्यामुळे अंगणवाडी शिक्षिका व मुलांना शाळेचे गेट उघडेपर्यंत बाहेरच थांबावे लागते. त्यामुळे अंगणवाडी शिक्षिका यांचे असे मागणे आहे की आम्हाला पण एक गेटची चावी द्यावी. ही मागणी अंगणवाडी शिक्षकांनी वारंवार केलेले आहे परंतु कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मुलांना व शिक्षिका व अंगणवाडी मदतनीस यांना बाहेरच थांबावे लागते.

शाळेच्या कंपाऊंड मध्ये एक सार्वजनिक हातपंप आहे. त्या हा पंपावर ही ग्रामस्थांना पाणी भरण्यासाठी जाता येत नाही. कारण की गावात पाण्याची हात पंप होते ते आपण वरती काही ग्रामस्थांनी अतिक्रमण केलेले आहे व ते त्यांचा खाजगी वापर करत आहे. तेवढा एकच हातपंप शिल्लक राहिलेला आहे परंतु तोही शाळेच्या कंपाऊंडमध्ये आहे. परंतु शाळेचे गेट बंद असल्याकारणाने ग्रामस्थांना पाणी त्या हातपंपावर आणता येत नाही त्यामुळे ग्रामस्थांचंही असे म्हणणे आहे की शाळेचे गेट उघडे ठेवावे कारण की आम्हाला त्या हातपंपावर पाणी आणता येईल. कारण गावात एक पाण्याची टाकी आहे परंतु ती गावाच्या एका बाजूला आहे. मुळे काही आदिवासी समाजाला दूर पडते. व शाळेच्या कंपाऊंडमध्ये असलेला हातपंप जवळ आहे. त्यामुळे त्यांचे असे म्हणणे आहे की शाळेचे गेट पाणी आणण्यासाठी उघडे ठेवावे. ग्रामस्थांची मागणी आहे. याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Discussion about this post