आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राजभवनात उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेची मुदत आज संपत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नुकतीच राज्याची विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळाले आहे. मात्र, अद्यापही मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने नवीन सरकारचा शपथविधी सोहळा रखडला आहे.
यादरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन त्यांच्याकडे दिला आहे.
Discussion about this post