हवेली ,प्रतिनिधी अनिल वाव्हळ – 9975381310
जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे.भारताचे संविधान हे देखील जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून परिचित आहे. संविधान हा भारताचा आत्मा आणि गाभा आहे. न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधुता,
धर्मनिरपेक्षता,व्यक्तीप्रतिष्ठा ही संविधानाची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे आहेत. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान बहुमोल आहे.विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचा अभ्यास करून सुजाण नागरिक बनावे
असे प्रतिपादन साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वप्रथम घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सोहम दुबळे या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले.विद्यालयातील शिक्षिका रेश्मा बोडके यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती सांगितली. तर गणेश निचळे यांनी विद्यार्थ्यांकडून संविधानाची उद्देशिका म्हणून घेतली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,माधुरी राऊत, सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post