मलकापुर :- गेल्या अनेक दिवसापासून वाघाने पाळीव प्राण्याची शिकार केली अशा बातम्या सुरूच आहे त्यात आणखी भर पडली ते म्हणजे मलकापूर तालुक्यातील माकनेर शिवारातील एका इसमाची आपल्या शेतामध्ये गाय बांधलेली होती त्या गायची शिकार करून तिला ठार मारण्यात आले जानकार लोकांचे म्हणणे आहे की, त्या गाईची वाघाने शिकार करून तिला गत प्राण केले यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे गेल्या काही दिवसा अगोदर घिर्णी शिवारामध्ये सुद्धा अशाच प्रकारे गायीची शिकार बिबट्याने केली होती त्याच भीतीपोटी शेतीमध्ये काम करण्यासाठी मजूर सुद्धा तयार होत नाही, अशा भीतीपोटी शेतकऱ्यांनी शेती कशी करावी हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामध्ये आता रब्बी हंगाम सुरू झाला आहे व घिर्णी ,माखनेर, उमाळी, भाडगणी, दाताळा या गावांना नळगंगा धरणातील कालव्याद्वारे रब्बी हंगामात शेती करण्यासाठी पाणी सोडल्या जाते आणि शेतीमध्ये रात्रीची लाईट असते अशा अनेक बाबींमुळे शेतकरी रात्रंदिवस आपल्या शेतामध्य
काभाळ कष्ट करतो परंतु जंगलातील हिंसक प्राण्यांनी मानवी वस्तीकडे आपलं पलायन सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये भयंकर भीतीचे वातावरण तयार झाले आहे अशा बाबी अनेकदा घडून सुद्धा स्थानिक वनविभागाचे याकडे दुर्लक्षच झालेले आहे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे की अशा हिंसक प्राण्यांपासून त्यांची रक्षा कोण करेल व ते बिंदासपणाने आपली शेती करतील.
Discussion about this post