2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असावे? या प्रश्नावर भूम तालुक्यातील विविध राजकीय नेत्यांचे विचार विविध आहेत. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे स्थानिक नेते या मुद्द्यावर आपले मत व्यक्त करत आहेत
भारतीय जनता पार्टीचे प्रबळ मुख्यमंत्री दावेदार – देवेंद्र फडणवीस
भारतीय जनता पार्टी भूम तालुका सरचिटणीस मा.श्री संतोष सुपेकर यांच्या मते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते व या महायुतीच्या विजयाचे शिल्पकार मा.श्री देवेंद्र फडणवीस हे 2024 मध्ये मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत 2014 नंतर महाराष्ट्राला विकासाची दिशा दाखवणारे कणखर व्यक्तिमत्व असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते मा.श्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावा अशी भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर यांची इच्छा आहे

राष्ट्रवादी काँग्रेस गट – अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष एडवोकेट रामराजे साळुंखे यांच्या मते सर्वस्वी राजकारणाला वाहून घेतलेल्या व महाराष्ट्रात तुफान प्रचंड गाजलेले योजना लाडकी बहिणी योजना आमलात आणणाऱ्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे वर्ग करणाऱ्या त्यामुळे महायुतीला महासत्ता स्थापन करण्यासाठी बळ मिळाले असे माननीय अजित पवार हेच 2024 मध्ये मुख्यमंत्री व्हावे असे तालुकाध्यक्षांची इच्छा आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गट – एकनाथ शिंदे
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भूम शहराध्यक्ष श्री संजय पवार यांच्या मते चालू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच परत एकदा मुख्यमंत्री पदाचा चान्स मिळाला पाहिजे त्यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यामुळे मराठा आरक्षणाची तीव्रता कमी झाली त्यामुळे शहराध्यक्ष संजय पवार यांना वाटते की परत एकदा मुख्यमंत्री पदावर माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी बसावे.

राष्ट्रवादी काँग्रेस – युवा नेतृत्व अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक कार्याध्यक्ष मनोज जगताप यांच्या मते 2024 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजित पवार हेच झाले पाहिजे असे त्यांचे वैयक्तिक मत आहे अजित पवार यांची प्रशासनावर चांगली पकड आहे डॅशिंग नेतृत्व आणि काम करण्याची उत्तम पद्धत यामुळे 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना पहायला सर्वांना आवडेल असे त्यांचे वैयक्तिक मत आहे.

भाजपचे शंकर खामकर – देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व सर्वोत्तम
मुख्यमंत्रीपदासाठी मा श्री देवेंद्र फडणवीस हे योग्य उमेदवार आहेत असे मत भाजप तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर खामकर यांनी व्यक्त केल्या आज तागायत त्यांच्यावर कसलाही कलंक न लागलेले निष्कलंक नेतृत्व तसेच सर्वांना धरून चालणारा माणूस इतर पक्षांना सोबत घेऊन चालणारा माणूस विरोधी पक्षाने त्यांच्यावर अनेक वैयक्तिक हमले केले तरी त्यांनी ते सहज पचवले त्यांना कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही शांत व संयमी असणारे नेतृत्व तसेच महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे नेतृत्व त्यामुळेच मला असे वाटते की 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच व्हावे.

शिवसेना शिंदे गट – एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व कायम राहावे
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती ज्यांच्या अध्यक्षतेखाली लढली असे लढवय्ये नेतृत्व असणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत तयार झालेले शांत संयमी नेतृत्व मा.मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना भूम तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख मा. श्री बालाजी बापू गुंजाळ यांनी व्यक्त केली. मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे सर्व समावेशक असे निर्णय घेण्याची क्षमता ज्या योजना गोरगरिबांसाठी काढल्या होत्या त्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवल्या त्या पोहोचल्या का नाही त्यासाठी त्यांनी वैयक्तिक लक्ष दिले असा गोरगरीब जनतेचा कैवारी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच महाराष्ट्राचे 2024 चे मुख्यमंत्री असावेत अशी भावना भूम तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख माननीय श्री बालाजी गुंजाळ यांनी व्यक्त केली

निष्कर्ष
महाराष्ट्रातील २०२४ चे मुख्यमंत्री पद कोण मिळवणार यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे स्थानिक नेते प्रत्येकाचे नेतृत्व योग्य ठरवताना आपले मत व्यक्त करत आहेत. आता येरझार काळात महाराष्ट्रातील जनतेच्या निर्णयावरच अंतिम उत्तर अवलंबून राहील.
Discussion about this post