
कांबी दि 1 प्रतिनिधी कृष्णा सोलाट
चंपाषष्ठी निमित्ताने कांबीगावात उद्या पासून यळकोट यळकोट जय मल्हार म्हणतं कांबी गाव व परिसर दुमदुमनार आहे.
कांबी येथील खंडोबा भक्त यांच्या वतीने मंदिर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ करणार आहे. खंडोबा चंपाषष्ठी उत्सवास कांबी येथे जेजुरी येथुन आणण्यात आलेल्या ज्योतीने घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ होणार आहे.
वार शनिवार(दि.७) पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात दररोज संध्याकाळी जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून चंपाषष्ठीच्या दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी पाच वाजता मल्हारी मार्तंड देवाच्या लंगराची व खंडोबा भक्त मंडळीची तसेच बारागाड्या ओढणारे मानकरी यांची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. मिरवणूकीची सांगता झाल्यानंतर मंदिर प्रागंणात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होईल. यानंतर श्री खंडेराव महाराज मंदिरात महाआरती संपन्न होईल. रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार असून पहाटे लंगर तोडून यात्रेची सांगता होईल.अशी माहिती खंडोबा भक्त यांच्या वतीने देण्यात आली . प्रतिनिधी कृष्णा सोलाट 9309216803
Discussion about this post