तालुका प्रतिनिधी /विशाल मोरे:-
मानोरा तालुक्यातील असोला गव्हा आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाढण्यापूर्वीच वन्यप्राण्याकडून केली जात आहेत नष्ट
मानोरा : मानोरा तालुक्यातील शेतकरी शेतात हरभरा पिकवला जात असून वन्य प्राणी हरभरा गहू पिक वाढण्यापूर्वीच नष्ट करत आहेत. त्यामुळे मानोरा तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळले असून, शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांवर वनविभागाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.मानोरा तालुक्यातील फुलउमरी.आमदरी आसोला गव्हा देवठाणा, या परिसरात बाजूंनी बंदी असल्यामुळे रोही रानडुक्कर या वन्य प्राण्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गहू हरभरा पिकाची लागवड केली आहे. या भागातील वन्य प्राणी हरभरा पिकाची उगवण होण्याआधीच नाश करत आहेत, त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.
शेतकऱ्यांनी महागडे बियाणे आणून शेतात हरभरा पिकाची लागवड केली आहे, मात्र वन्य प्राण्यांनी शेतातील गहू हरभरा पिक उगवण्यापूर्वीच नष्ट केल्याने शेतकऱ्यांची अडचण होत असून, वनविभागाने वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी रिसोड तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.जी जनावरे शेतातील गहू हरभरा पिकाचे नुकसान करतात त्या वन्य प्राण्यांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वन्य प्राण्याकडून रिसोड तालुक्यातील शेतातील पिकाचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान वनविभाग भरून देणार का? असा प्रश्न शेतकऱ्याकडून वनविभागाला विचारल्या जात आहे.गव्हा येथिल दिनेश मोरे यांनी वन्यप्राणी यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे
Discussion about this post