रविवार दिनांक ११/०८/२०२४ ला भारतीय जनता पार्टी हिंगणघाट शहर व ग्रामीण पदाधिकारी आणि कार्यकर्ता अधिवेशन स्थानिक जे. आर. निखाडे भवन येथे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले असून या अधिवेशनाला अध्यक्षपदी मा. आमदार समीर कुणावार, प्रमुख वक्ते म्हणून जिल्हाध्यक्ष सुनीलजी गफाट, देवळी निवडणूक प्रमुख राजेशजी बकाने लाभले होते. तर जिल्हा उपाध्यक्ष किशोरजी दिघे, महामंत्री आकाशजी पोहाणे,
माजी नगराध्यक्ष प्रेमजी बसंतानी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुशजी ठाकूर, निवडणूक प्रमुख संजयजी डेहने, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री अनिताताई मावळे, भटक्या विमुक्त जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद लांडगे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी कुंटेवार, विधानसभा प्रमुख रवींद्र लढी, जिल्हा चिटणीस किरणजी वैद्य, जिल्हा चिटणीस आशिषजी पर्बत, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव रविभाऊ उपासे, व्यापारी आघाडीचे सुभाष निनावे, जिल्हा चिटणीस भग्येशजी देशमुख, जिल्हा महामंत्री राहुलजी चोप्रा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार समीर कुणावार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. खोटा नरेटीव्ह पसरवणाऱ्या राकाँ.(श.प) नेत्यांचा खरपूस समाचार घेत आपल्या विकासकामांचा लेखाजोखा अधिवेशनात मांडला. प्रमुख वक्ते जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी मोदी सरकार व महायुती सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. राजेश बकाने यांनी जिल्ह्यात भाजपला सर्वात पोषक वातावरण हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात असल्याचे सांगितले. तत्पूर्वी माजी नगराध्यक्ष प्रेमजी बसंतानी यांनी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र सरकारचा अभिनंदनाचा राजकीय ठराव मांडला या ठरावास जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे यांनी अनुमोदन दिले. नवमतदार नोंदणी या विषयावर खुशाल चेले यांनी माहिती दिली. विशेष म्हणजे या अधिवेशनाची सुरुवात बूथ प्रमुख सुयोग नागुलवार व शक्तिकेंद्र प्रमुख राकेश शर्मा यांच्याहस्ते मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले.
दिवंगत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता यांना या अधिवेशनात श्रद्धांजली वाहण्यात आली. हा शोकप्रस्ताव निवडणूक प्रमुख संजयजी डेहने यांनी मांडला. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुंटेवार यांनी देशभक्तीपर गीत गाऊन कार्यकर्त्यांमध्ये स्पूर्ती आणली. अधिवेशनाचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष भूषण पिसे यांनी केले. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष संजय माडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष विनोद विटाळे यांनी केले.
Discussion about this post