
कर्जत तालुक्यातील बोरगाव येथील तरुणीला अश्लील हावभाव आणि अश्लील हातवारे करून छेडछाड करण्याचा प्रकार झाला . त्यांनतर त्या तरुणीच्या भावाला आकाश पाटील याला जबर मारहाण करण्यात आली आणि नंतर जिवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आलीत्याच घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच नवी मुंबई येथील उरण भागातील यशश्री शिंदे या पिडितांवरील हल्याचा निषेध करण्यासाठी दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास नेरळ मध्ये समस्त हिंदू समाज यांच्या वतीने मुक मोर्चाचे नियोजन करण्यात आले .
यामध्ये कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांच्या वतीने मुक मोर्चाचा निर्णय घेतला होता त्या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी ४० हिंदु वकिलांनी पाठींबा देत समस्त हिंदु धर्मीयांचा मुक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला या मोर्चा च्या वतीने ॲड. दीपक गायकवाड ॲड. अमोल सूर्यवंशी ॲड. नरेश अहिर तसेच शाम कडव ॲड. तुषार भवारे. अक्षय म्हात्रे ॲड .गायत्री परांजपे. हेमंत हजारे . सचिन धुळे भडवळ . नम्रता कांदळगावकर. बोरगाव येथील माजी उपसरपंच अशोक पाटील. श्रेया चंचे.ॲड. सूर्यकांत मसने.माधव कोळंबे. रवींद्र मसने. यांनी पुढाकार घेतला व आपले मनोगत ही व्यक्त केले .
मुक मोर्चा मध्ये सुमारे तीन हजार पेक्षा जास्त हिंदु धर्मीय उपस्थित होते नेरळ येथील सी एन जी पंपावर शुक्रवारी दामत येथील चार मुस्लिम तरुणांनी बोरगाव येथील तरुणीला अश्लील हावभाव करून छेड काढली आणि नंतर त्या तरुणीच्या भावाला लोखंडी हत्याराने मारहाण केली या घटनेचा निषेध करण्यासाठी मारुती मंदिरा मध्ये समस्त हिंदूंची बैठक आयोजित करण्यात आली होती .
छत्रपति शिवाजी महाराज मैदान येथून मुक मोर्चा ला सुरुवात झाली व पुढे लोकमान्य टिळक वाचनालय येथून हुतात्मा हिराजी पाटील चौक असा माथेरान नेरळ रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक असा भाई कोतवाल चौक मार्गे नेरळ स्टेशन येथून टॅक्सी स्टँड खांडा कल्याण कर्जत रस्त्याने नेरळ पोलिस ठाणे येथे पोहोचला या मुक मोर्चाच्या निमित्ताने समस्त हिंदु धर्मीय यांच्या वतीने नेरळ पोलिस ठाणे चे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे साहेब व जिल्हा पोलिस उपअधीक्षक टि . टि . टिळे साहेब यांनी हे निवेदन स्वीकारले .
पुरावे नष्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा .
नेरळ पोलिस ठाणे येथे जिल्हा पोलिस उपअधीक्षक टि.टि.टिळे साहेब यांनी हे निवेदन स्वीकारले. मोर्चेकरी यांच्याकडून ज्या सीएनजी पंपाच्या मालकांनी सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला असून त्यांचावर गुन्हे दाखल करावेत , अशी मागणी निवेदनात केली .
Discussion about this post