गोपाल जाधव 9970805590
मंठा प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद
बोर्डीकर तसेच नवनिर्वाचित आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दि ०२ डिसेंबर सोमवार रोजी मुंबईत देवगिरी या शासकीय बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली व राज्यात महायुतीने मिळविलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल पवार यांचा यथोचित सत्कार केला. विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पवार यांनी सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे अभिनंदन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते रामप्रसादजी बोर्डीकर, प्रभाकर वाघीकर, दिनकर वाघ, पप्पू डोंबे, बाळासाहेब मते आदी उपस्थित होते
Discussion about this post