लोहा तालुका प्रतिनिधी
आपल्या आईवडिलां स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट घ्यावेत मेहनत व स्वतःवर विश्वास असावा तसेच यशस्वी जीवनात इंग्रजी भाषा येणे अत्यंत गरजेचे असून ती भाषा आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन इंग्रजी भाषेचे प्रख्यात मार्गदर्शक जी सिद्धार्थ यांनी केले
लोहा शहरातील जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे विध्यार्थ्यांना जी सिद्धार्थ यांनी इंग्रजी भाषा कशी आत्मसात करावी या भाषेत कसे बोलावे याचे हसत खेळत मार्गदर्शन केले .इंग्रजी भाषा आपणास आली पाहिजे असे प्रत्येकास वाटते पण त्यासाठी आपण प्रयत्न करत नाही .फार अवघड भाषा आहे असा समज झालेला असतो स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात गुण कमी येतात त्यामागची कारणमीमांसा सांगताना अनेक उदाहरणे त्यांनी दिली.आई वडिलांच्या स्वप्नपूर्ती साठी व भविष्यासाठी आपण एकाग्रता ठेवून अभ्यास करावा यश हमखास मिळेल तसेच इंग्रजी भाषा अवगत होते काळाची गरज आहे त्या भाषेचे महत्व सांगितले तसेच शरीरावर इंग्रजी भाषा कशी बोलली जाते त्याचे ट्रॅक त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले .इंग्रजी भाषा यशस्वी जीवनासाठी महत्वाची आहे असे जी सिद्धार्थ यांनी मार्गदर्शन केले. जिज्ञासा अभ्यासिकेचे
संस्थापक हरिहर धुतमल यांनी प्रास्ताविक केले .तर अभ्यासिकेच्या वतीने जी सिद्धार्थ यांचा सत्कार करण्यात आला.व्यवस्थापक बालाजी धनसडे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले
Discussion about this post