सुलतानपूर प्रतिनिधी हसन पठाण
26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात सामाजिक, सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेवून साजरा करण्यात येत आहे, त्या निमित्त परभणी जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्रच्या वतीने ही शहरातील पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजी. आर.डी. मगर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्तार इनामदार, ऍड. निलेश करमुडी, शिवाजी चव्हाण, रेणुका बोरा, खदीरलाला हाश्मी, प्रमोद कुटे, आदिंची उपस्थिती होती. महाराष्ट्रभरात सामाजिक, शैक्षिणक, सांस्कृतिक अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 40 महिला व पुरुषांचा संविधान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आज संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी केले होते. तर सूत्रसंचलन प्रा. राजकुमार मनवर यांनी तर आभार प्रदर्शन शेख सरफराज यांनी केले.
Discussion about this post