सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघेही आचरेकर सरांचे आवडते शिष्य.
सचिन उजवा आणि विनोद डावखुरा फलंदाज परंतु दोघेही मुंबईकर आणि खेळात उजवे असल्याने लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते.
कालच्या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांनी आचरेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला आणि अनेक किस्से सांगितले,सरांनी दिलेली शिकवण व संस्कार कोणताही न्यूनगंड मनात न ठेवता नवोदित खेळाडूंना बहाल करून सरांचे विचार त्यांच्या पश्चात जिवंत ठेवण्याचे काम करत एक अनोखी आदरांजली आपल्या गुरूंना वाहिली.
खरंतर विनोद कांबळी यांच्याकडे सुद्धा सचिन तेंडुलकर यांच्या सारख्या असंख्य आठवणी आणि किस्से असणारच.
पण बोलायची इच्छा असून सुद्धा त्यांना व्यक्त होता आले नाही याची अनेक कारणे असतील यांच्या खोलात अनेकजण कालपासून गेले असतील आणि जातीलही.
दिग्गजांच्या पंक्तीत बसण्याची कुवत असणार्या विनोद कांबळी यांच्यासारखा खेळाडू स्वतःवर आणि जडणाऱ्या वाईट सवयींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कमी पडला.
आणि आपण एका दिग्गज खेळाडूला मुकलो.
चांगल्या सवयी वाढवल्याने,
वाईट सवयींपासून स्वतःला दूर करता येईल.
Discussion about this post