अश्रु ढाळले सागरांनी…
अंधारच होता ज्याच्या नशिबी
त्याने प्रकाशाचे दान दिलं
समता स्वातंत्र्य बंधुता असलेलं
माझ्या बाबांनी संविधान दिलं ॥१॥
समाज हितासाठी संसार मोडला
दीनदुबळ्यासाठी सदैव झटला
चार लेकरं गमावली त्या क्षणी
परंतु बहुजनांसाठी मागे ना हटला ॥२॥
चवदार तळ्यावर शूद्रांना नव्हते पाणी
निडर होवूनी केला सत्याग्रह ज्यांनी
समानता निर्माण करणे ध्यास मनी
भीमा तुझ्यासारखा नाही रे कोणी ||३||
महिलांना दिले आरक्षण
हिंदू कोड बिल लिहिले
होती रमाई सोबतीला
स्वप्न ते साकार जाहले ||४||
युगंधर महामानव विश्वरत्न
कायदेतज्ञ असे तुम्ही क्रांतीसुर्य
जगातील सर्व पदव्या तुम्हास
बहाल असे तुम्ही प्रज्ञासुर्य ||५||
6 डिसेंबर 1956 रोजी
अस्त महान पर्वाचा
अश्रू ढाळले सागरांनीही
मिटला सुर्य सोनेरी क्षणाचा ||६||
प्रितम माकोडे (यवतमाळ)
इंदुताई मेमोरिअल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हरदोली (झं)
ता. मोहाडी जि. भंडारा
मो. 9011622235
Discussion about this post