सारथी महाराष्ट्राचा शिरूर तालुका प्रतिनिधी सुरेश आप्पा गायकवाड
बोतार्डे : जुन्नर तालुक्यातील मौजे बोतार्डे पो. खानगाव ता. जुन्नर जि. पुणे येथे आज गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बिरसा भवन येथे साप्ताहिक उद्याचा शिलेदारचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाटन मा. राजेश साबळे ओतूरकर यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे उदघाटक राजेश साबळे ज्येष्ठ साहित्यिक, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जनार्दन मरभळ, डॉ. खंडू माळवे ज्येष्ठ साहित्यिक, संभाजी साळवे, डॉ. राजेश्वर हेंद्रे सर, सुरेश आप्पा गायकवाड पत्रकार, पोपटराव वाघमारे, जयदेव साळवे, पोपट राक्षे आर. पी. आय तालुकाध्यक्ष, वंदना ताई डोळस सरपंच, कुलदीप कोकाटे पोलीस पाटील, सुरेश खरात आर. पी. आय उपाध्यक्ष, व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून प्रा. सतिश शिंदे यांनी साप्ताहिकाच्या आजपर्यँतच्या वाटचालीचा इतिहास मांडून खडतर प्रवास सांगितला, यानंतर सर्व मान्यवरांचा ट्रॉफी, पुस्तक, सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला, नंतर डॉ. खंडू माळवे यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदारला शुभेच्छा देत असताना शासन स्तरावर जर काही अडचण आल्यास ती तातडीने दूर करून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले, डॉ. राजेश्वर हेंद्रे सर यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदारला द्वितीय वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन कार्यक्रमप्रसंगी त्यांनी विशेष डायरी भेट देऊन त्यांच्या मौलिक विचारांनी सभेला त्यांनी संबोधित केले, राजेश साबळे ओतूरकर ज्येष्ठ साहित्यिक यांनी त्यांच्या विशेष साहित्यिक शैलीत उद्याचा शिलेदारच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके भेट दिली व सभेला संबोधित केले, संभाजी साळवे, पोपटराव वाघमारे, पोपट राक्षे, जयदेव साळवे, ऍड. इंद्रभान गुंजाळ यांनी देखील उद्याचा शिलेदारला शुभेच्छा दिल्या व असेच कार्य संपादक प्रा. सतिश शिंदे व सौ. शितल शिंदे यांच्याकडुन व्हावे असे यावेळी त्यांनी सांगितले, अर्जुन जाधव चेअरमन अर्जुन पीपल्स पतसंस्था पुणे हे देखील पुण्यातून कार्यक्रमांस उपस्थित राहून त्यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदार व टीमला द्वितीय वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन कौतुक केले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन मरभळ यांनी अध्यक्षीय मनोगतातून उद्याचा शिलेदारला द्वितीय वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन साप्ताहिकाच्या दोन वर्षाच्या कालखंडाचा मागोवा सांगितला व सर्वांना शुभेच्छा दिल्या, संपादिका शितल सतिश शिंदे यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदारला शुभेच्छा दिल्या व साप्ताहिकाचा खडतर प्रवास कथन केला.
या कार्यक्रम प्रसंगी विलास मरभळ, चैतन्य घोडे, मुकेश मरभळ, दिपक सोनवणे, वैभव खरात, सीताराम सोनवणे, विश्वास शिंदे, इंदुबाई खरात, सुनीता खरात, शरद शिंदे, प्रज्वल शिंदे, प्रीती शिंदे, श्रावणी शिंदे व इतर ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.
यानंतर कार्यक्रमाचे आभार बाळू खरात यांनी मानले तर सूत्रसंचालन सिद्धी तलांडे व सौ. शितल शिंदे यांनी केले
Discussion about this post