निलेश कोकणे 9503442004
माण तालुका प्रतिनिधी (सातारा )
वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार जतन करुन सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकार आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपाईं (आ), रयत क्रांती संघटना, जनसुराज्य शक्ती पक्ष, लहुजी शक्ती सेना आणि महायुतीतील सर्व पक्षांचे प्रमुख नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, बुथ कार्यकर्ते आदींनी प्रचंड मेहनत घेतली. परिणामस्वरुप भाजप-महायुतीला जनतेने मतदानरुपी प्रचंड #आशीर्वाद देऊन #महाराष्ट्राची_सत्ता हाती दिली आहे.
आज 5 डिसेंबर 2024 रोजी राज्याचे कार्यक्षम नेतृत्व, उत्तम संघटक, राजकीय कौशल्य अंगी असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आदरणीय श्री. Devendra Fadnavis साहेब हे राज्याचे #मुख्यमंत्री म्हणून #शपथ ग्रहण करणार आहेत. निश्चितच स्वाभिमानी महाराष्ट्रवासियांसाठी हा #अत्यानंदाचा_दिवस असणार आहे. प्रगतशील, विकासाची जाण, दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या हाती हे राज्य असल्याने सर्व समाज घटकांना न्याय मिळून सर्वांगीण विकासाची एक वेगळी उंची राज्य गाठील, यात यत्किंचितही शंका नाही.
भाजप-महायुतीचे आज स्थापन होणारे सरकार राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी, उत्थानासाठी सातत्याने काम करुन उद्याचा शिवछत्रपतींच्या विचारांचा सामर्थ्यशाली महाराष्ट्र घडवील, हे अंतीम सत्य!
Discussion about this post