गुहागर प्रतिनिधी (नरेश मोरे) - नव्या वर्षाच औचित्य साधत, नवा शुभारंभ प्रयोग अर्थात अभिनया पासून वंचित असलेल्या नवोदित कलाकारांच्या संच घेऊन सादर करत आहे. कोकणच्या संस्कृतीवर प्रकाश टाकून दाहीदिशा उजळणारी कोकणच्या मातीतली एक धमाल विनोदी दोन अंकी मराठी नाटक.
नवोदित कलाकारांना आपल्या अंगी असलेली कला दाखवण्यासाठी मिलिंद रेश्मा विनायक ठीक लिखित आणि चला हवा येऊ द्या फेम अनंत विनायक ठीक दिग्दर्शित धमाल विनोदी दोन अंकी मराठी नाट्यकलाकृती " नमान करायची झाले घाई पण करायला कोण नाही बाई " या नाटकाच आयोजन केलं आहे. ह्या भव्य नाटकाचे सुत्रधार नितीन मोरे असुन त्यांनी सर्व नवोदित कलाकारांना एकत्र आणण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. हा कार्यक्रम मुंबईसारख्या मोठ्या रंगमंचावर सादर होणार आहे. तर मंडळी हा कार्यक्रम पाहण्यासाठी रविवार दि.०५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता मराठी साहित्य संघ मंदिर, गिरगाव , चर्नी रोड , मुंबई येथे आपण सर्वांनी उपस्थित रहावं. असे आवाहन M.A.A Production तर्फे करण्यात आला आहे. नक्की काय असेल या नाट्यकला कृती मध्ये. रसिक माय-बाप प्रेक्षकांच मनोरंजन हमखास होणार कारण चला हवा येऊ द्या फेम अनंत ठीक येतोय कॉमेडीची फटकेबाजी करायला , हसविण्यासाठी फुल धमाल होणार. तर मंडळी तिकीटसाठी अनंत ठीक ९८६७३४३४२४, अमित भुवड ९७६८५२४००७ , चंद्रकांत अवेरे ९७०२१४७७०४ यांच्याशी संपर्क साधावा.
Discussion about this post