सावंतवाडी (प्रतिनिधी)-
सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रनेकडे स्पेशालिस्ट डॉक्टर व योग्य मशीनरी नसल्याने यंत्रणा कोमात आहे. मागील कित्येक वर्षांपासून गोरगरीब जनतेला मोठया आजारावर योग्य आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने उठसूठ बाबुंळी गोवा रूग्णालयात पाठवावे लागत आहे . एखाद्या अपघात जखमी झालेल्या रुग्णांना यामुळे जीव गमवावे लागत आहेत. यावर विचार विनिमय करून पुढील दिशा ठरविण्यासाठी येत्या रविवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मळगाव भूतनाथ मंदिर मध्ये येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रूग्णालय, बांदा ग्रामीण रुग्णालय अशी रूग्णालयांची साखळी तयार असूनही डॉक्टर, मशीनरी व औषधा अभावी रूग्णांची हेळसांड होत आहे. आज आजार वाढत असून बदलत्या हवामानामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुका झाल्या नसल्याने उठसूठ बाबुंळी गोवा रूग्णालयात अधिक उपचारासाठी रूग्णांना पाठविले जात आहे. अपघात, साप चावला, जळला अशा कोणत्याही अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना गोव्यात जावे लागत आहे त्यामुळे हकनाक बळी पडू लागले आहेत. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून एकत्र येऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी मळगाव भूतनाथ मंदिर मध्ये एकीचे बळ निर्माण करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
Discussion about this post