
अनंत श्री विभूषित जगहुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा दि.९ व १० डिसेंबर रोजी श्री क्षेत्र रामशेज उत्तर महाराष्ट्र उपपीठ नाशिक येथे भव्य समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील
भक्तगनांच्या वतीने विविध माध्यमातून सोहळ्याचा प्रचार प्रसार केला जात आहे.सामाजिक कार्य व सोबतच आध्यात्मिक ज्ञान देणारे जगदुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या
मार्गदर्शनाचा कार्यक्रम हा दोन्ही दिवस राहणार असून जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे. तसेच ९ डिसेंबर रोजी नवीन भक्तगनांना उपासक दीक्षा देण्यात येणार असून व दि.१० रोजी जगद्गुरू श्रींच्या पवित्र उपस्थित साधक दीक्षा देण्यात येणार आहे, तीन महिन्यानंतर जगद्गुरू श्रींचे नाशिक मध्ये आगमन होणार असून सर्व
भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, जगदुरु श्रींच्या दर्शनाची सर्वच भक्तगणांना ओढ लागली असून गावोगावात वाडी वस्त्यांवर कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला जात आहे, मोठ्या संख्येने भाविकांनी सोहळ्यासाठी उपस्थित राहून जगदुरू श्रींच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आव्हान उत्तर महाराष्ट्र उपपीठा च्या वतीने करण्यात आले आहे..
Discussion about this post